मुदतीनंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील गुंठेवारी नियमितीकरणासाठी दिलेल्या ९० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ३१ जुलैपर्यंतच मुदत उरली आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून, मुदतीनंतर अनधिकृत बांधकामांवर थेट
कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
प्राधिकरणाचे आयुक्त तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी नुकताच प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची विनापरवाना बांधकामे, मालमत्ता अभय योजनेअंतर्गत बेटरमेंट चार्जेस उपलब्ध करून देण्यात आली
आहे. यामध्ये १ मे ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत बेटरमेंट चार्जेसवर फक्त दहा टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. म्हणजेच एकूण ९० टक्के सवलत देण्यात
५० टक्के सवलत ३१ ऑक्टोबरपर्यंत
▶ मालमत्ता धारकांनी आपली मालमत्ता नियमित करून घ्यावी. त्यानंतर १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ५० टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. तर १ नोव्हेंबर २०२६ पासून मात्र पूर्ण शुल्क आकारले जाणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच नियमानुसार नसलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी इनामी जमीनींवर परवानगी नसतांना अनधिकृतपणे प्लॉटिंग करून विकल्या जात असल्याबाबत नागरिकांनी दक्ष राहावे, असे सूचित केले.
आलेली आहे. या योजनेस यानंतर कुठल्याही परिस्थितीत
मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त तथा
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.













